नवी मुंबई : तुर्फे स्थानकावर तरुणीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वे स्थानकात 43 वर्षीय इसमाने एका मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्म नंबर दोनवर ही घटना घडली. नरेश जोशी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नरेश हा नवी मुंबईच्या घणसोली परिसरात राहतो. संबंधित तरुणी लोकलची वाट पाहत असताना त्यानं मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. आरोपीला वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं असून अधिक चौकशी चालू आहे.