नवी मुंबई : हार्बर मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक, प्रवाशांचा मनस्ताप कायम
Continues below advertisement
हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांना आज (27 डिसेंबर) आणि उद्याही (28 डिसेंबर) मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण हार्बर लाईनवर दोन दिवसांचा तातडीचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
बेलापूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दुरुस्तीचं काम सुरु आहे. त्यामुळे हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत.
खरंतर मागील चार ते पाच दिवसांपासून हार्बर मार्गावरील प्रवाशांना या ना त्या कारणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उरण मार्गाच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे नेरुळ ते पनवेल ही सेवा पूर्णपणे ठप्प होती. पण ही सेवा सोमवारी रात्री सुरु झाली.