नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या : तपास संगीता अल्फान्सोंकडे द्या, पतीची मागणी

Continues below advertisement
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणाचा तपास एसीपी नितीन राऊत यांच्याकडून काढून संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली आहे. बिद्रे हत्याप्रकरणात मुख्य तपास अधिकारी असलेले नितीन राऊत यांना संपूर्ण तपासाचं श्रेय मिळत नसल्याची तक्रार राऊत यांनी राजू गोरे यांच्याकडे केली. मात्र तपासात जर अधिकारी श्रेय घेणार असतील तर तपास योग्य दिशेने कसा होईल अशी शंका उपस्थित करत राजू गोरे यांनी राऊत यांच्या बदलीची मागणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram