नवी मुंबई : 5 वर्षांनंतरही कामोठे सबवेचं काम रखडलेलं, हायकोर्टात याचिका दाखल
Continues below advertisement
सायन - पनवेल हायवेंचं रूदींकरण करून ५ वर्ष होवूनही कामोठेमधल्या सबवेचं काम मात्र रखडलेलं आहे. कामोठे मधून हायवेला बाहेर येताच मुंबईच्या दिशेला जाणारा सबवे मँग्रोजच्या कचाट्यात अडकलाय. PWD विभागाच्या निष्क्रीयतेमुळे ही वेळ आल्याचं बोललं जातंय. या विरोधात कामोठे रहिवाशांनी अनेक आंदोलनं केली पण याची दखल कोणीही घेतली नाही. त्यामुळे आता कॉन्शियस सिटीजन फोरम या संस्थेने या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचीका दाखल केली आहे.
Continues below advertisement