नवी मुंबई : रस्त्यासाठी मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजी, पालिकेने 40 कोटी वाचवले

Continues below advertisement
एकीकडे मुंबई पालिकेत रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे अधिकाऱ्यांच्या नावाने चांगभलं सुरु असताना दुसरीकडे नवी मुंबई पालिकेतील अभियंता विभागाने रस्त्याच्या कामात तब्बल 40 कोटी वाचवल्याने त्यांची वाहवा होत आहे. मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करीत पालिकेने पाम बीच रस्त्याचे काम केले आहे. यासाठी पालिकेला 7 कोटी खर्च आला आहे. हेच काम नेहमीच्या पद्धतीने केले असते, तर 45 ते 50 कोटी रुपये खर्च आला असता.

नवी मुंबई महापालिकेने अनेक वेळा अत्याधुनिक पद्धतींचा वापर करुन शहराच्या समस्या सोडवत राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करीत आपल्या मुलभूत समस्येवर दीर्घ काळासाठी उपाय शोधले आहेत. आधुनिक पद्धतीने डम्पिंग ग्राउंड तयार करून कचऱ्याच्या विल्हेवाटाची  समस्या संपवली. पालिका अभियंता विभागाने शहरातील रस्ते खड्डेमुक्त करतानाच खर्चही कसा वाचला जाईल याकडे लक्ष दिले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram