
नवी मुंबई : ब्रेक फेल झालेल्या बसची सहा वाहनांना धडक
Continues below advertisement
पनवेलमध्ये उड्डाण पुलावर आज एक विचित्र अपघात झाला. नवी मुंबई महापालिकेच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने या बसने तब्बल 6 गाड्यांना धडक दिली. या अपघातात सहा गाड्यांसह एका बाईकचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. परिवहन गाड्यांची योग्यरित्या दुरुस्ती केला जात नसल्याने प्रकारच्या अपघातात वाढ होत असल्याचं बोललं जातं आहे.
Continues below advertisement