नवी मुंबई: MGM रुग्णालयात सायबर हल्ला, हॅकरकडून बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी

वाशीतील एमजीएम रुग्णालयाची संपूर्ण माहिती अज्ञात हॅकरने हॅक केली आहे. यंत्रणा पूर्ववत करायची असेल तर हँकर्सनी बिटकॉइनद्वारे खंडणी द्या, अशीही अट घातलीय.
या सायबर हल्ल्यात रुग्णालयाचा मागचा १५ दिवसांची माहिती चोरीला गेली आहे.
याबाबत तक्रार देण्यात आली असून अज्ञात हॅकर्सविरोधात आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात खारघर येथील थ्री स्टार हॉटेलची संपूर्ण यंत्रणा अशाच पद्धतीने हॅक करण्यात आली होती. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाकडे ४०० यूएस डॉलर आणि बिटकॉइनची मागणी करण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola