
नवी मुंबई : लोकलच्या डब्ब्यात महिला प्रवाशांचा विनयभंग
Continues below advertisement
रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. वाशी रेल्वे पोलिसांनी तीन जणांना महिला प्रवाशांचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केलीये. आईसोबत प्रवास करणाऱ्या तरुणीसमोर उमाशंकर दुबे या आरोपीने अश्लील चाळे केले होते. घणसोली स्टेशनवर आरोपी विवेक कांबळे यांनी महिलेला मागून स्पर्श केला. तर मानखुर्द रेल्वे स्थानकात तरुणाने थेट मुलीच्या हातावर मोबाईल नंबर लिहुन तिला स्पर्श केला.
Continues below advertisement