नवी मुंबई : एपीएमसीत हापूसची आवक घटली, दर गगनाला भिडले
Continues below advertisement
अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त म्हणजे आंब्याची पहिली चव चाखण्याचा मुहूर्त.. पण या मुहूर्तावरच थोडं विरजण पडण्याची भीती आहे.
कारण नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक तब्बल 50 टक्क्यांनी घटली आहे.
त्यामुळे सोन्याच्या दरानं आंबा खरेदी करावी लागण्याची शक्यता आहे.
सध्या घाऊक बाजारात आंब्याचा दर 400 ते 900 रुपये डझन इतका आहे. तर किरकोळ बाजारात आंबा थेट 800 रुपयांपासून ते 1500 रुपये डझनाप्रमाणं विकला जातोय.
दरवर्षी कोकणातून अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर एक लाख पेट्यांची आवक होते, तर कर्नाटकातूनही 25 हजार पेट्या येतात. पण यंदा केवळ 60-65 हजार पेट्याच मुंबईत दाखल झाल्यात. त्यामुळे आंबा फक्त तोंडी लावावा लागणार असं दिसतंय.