नवी मुंबई : सिडकोच्या घरांसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरु
सिडकोच्या 15 हजार घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झालीय. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी ही जाहिरात आहे. घरांसाठीची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे तर नोंदणीकृत अर्जदार 15 ऑगस्टपासून अर्जाची नोंदणी करु शकतील. घरांच्या किमती 18 लाख ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. घणसोली, खारघर, तळोजा, कळंबोली, द्रोणागिरी या ठिकाणी ही घरं असणार आहेत.