नवी दिल्ली : चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
Continues below advertisement
चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावणं आता अनिवार्य नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2016 रोजी दिलेला आपलाच निर्णय बदलला आहे.
सिनेमाआधी राष्ट्रगीत अनिवार्य करु नये अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. या मुद्द्यावर आंतरमंत्रालयीन समिती स्थापन केली असून ती सहा महिन्यात आपल्या सूचना देईल, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं.
यावर निर्णय देताना, थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत बंधनकारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.