सिक्कीम : नाथुलामध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचं नमस्ते, तर चीनी सैनिकांचं 'नी हाऊ'
Continues below advertisement
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी चीनच्या सैनिकांना नमस्ते म्हणत अभिवादन केलं. सिक्कीमच्या दौऱ्यावर असलेल्या निर्मला सीतारमण यांनी चीनला लागून असलेल्या नाथुला सीमेला भेट दिली. यावेळी त्यांनी चीनच्या सैनिकांशी संवाद साधत त्यांना नमस्ते म्हटलं. तसंच नमस्तेला चीनी भाषेत काय म्हणतात असा सवाल देखील त्यांनी विचारला. चीनच्या सैनिकांनी देखील भारतीय संरक्षण मंत्र्यांचं नमस्ते स्वीकारत, नमस्तेला चीनी भाषेत 'नी हाऊ' असं म्हणत असल्याचं सांगितलं. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवर शेअर केला.
Continues below advertisement