नाशिक : योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांना पंतप्रधान पुरस्कार
Continues below advertisement
योगाचा प्रचार आणि विकास करण्यासाठी योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांचा पंतप्रधान पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. जागतिक योग दिनाचं औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. योग विद्या धाम या आपल्या संस्थेमार्फत मंडलिकांनी लाखो लोकांपर्यंत योग पोहचवला. याच कार्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. देशातल्या १८६ लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. चषक, प्रमाणपत्र आणि २५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
Continues below advertisement