नाशिक : निर्यातमूल्य हटवल्यानंतर कांदा बाजार वधारला
Continues below advertisement
केंद्र सरकारनं काल कांद्यावरच निर्यातमूल्य हटवल्यानंतर आज त्याचे चांगले परिणाम कांदा बाजारावर पाहायला मिळताहेत...आज येवला बाजारात कांद्याच्या सरासरी भावात क्विंटलमागं 400 रुपयांची वाढ झाली आहे. काल इथं क्विंटलमागं कांद्याचा सरासरी भाव १४०० रुपये होता..तोच आज वाढून १ हजार ७५१ रुपयांवर पोहचला आहे..तर १ नंबरच्या कांद्याचा भाव २ हजार २० रुपये क्विंटल राहिला..आज नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळं कांदा बाजारावरचा एकूण फरक समजू शकलेला नाही.
Continues below advertisement