नाशिक : फटाक्यांच्या आतषबाजीत छगन भुजबळ यांचं येवल्यात स्वागत

Continues below advertisement
जामिनावर सुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. भुजबळ येवल्यात दाखल होताच फाटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी भुजबळांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. 'छगन भुजबळ संपला असं बोललं गेलं, मात्र 2004 मध्ये येवल्याच्या मातीत तो पुन्हा जन्माला आला. आता मोर्चाच्या रुपाने तुम्ही मला शक्ती दिली आहे. मतदारसंघात अनेक प्रकल्प दुर्लक्षित आहेत. या दोन वर्षात कुणी लक्ष दिलं नाही. सुरुवातीला विनंती करण्याची आमची पद्धत आहे, त्यामुळे प्रशासनानं लक्ष देण्याची आम्ही विनंती करत आहोत' असा इशारा भुजबळांनी दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram