Water Wastage | कळवण तालुक्यातील धनोली धरणाचं गेट तोडलं, लाखो लिटर पाणी वाया | नाशिक | ABP Majha

Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील काही भाग दुष्काळानं होरपळत असताना, दुसरीकडे कळवण तालुक्यातील धनोली धरणाचे गेट तोडल्याची घटना समोर आलीय. यात लाखो लीटर पाणी वाया गेलंय. बाजूच्या शेतात काम करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी धरणाकडे धाव घेतली आणि गेट तोडणाऱ्या चौघांना पकडलं. आरोपींना पकडून त्यांना एका मंदिरात कोंडण्यात आलं. त्यानंतर प्रशासनातील अधिकारी तिथं दाखल झाले. त्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतलंय. धरणाचं गेट तोडल्यानं पाणी तर वाया गेलंच पण आजूबाजूच्या शेतीचंही मोठं नुकसान झालंय.  दुसरीकडे महापालिकेच्या टाकीतून हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचं समोर आलंय. सिडको परिसरातील वार्ड क्रमांक 28 मधील पाण्याची टाकीचा वॉल नादुरुस्त झाल्यानं पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेलंय. महापालिका सचिव सीताराम कुंटे यांनी पाणी काटकसरीने वापरायच्या सूचना दिल्या असताना, दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या टाकीतून अशा रितीनं पाणी वाया जाताना पाहायला मिळालं. तर नाशिकच्याच कळवणमध्ये 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram