नाशिक : 'वॉक विथ कमिशनर', कृषीनगर जॉगिंग पार्कवर तुकाराम मुंढेंचा नागरिकांशी संवाद

Continues below advertisement
नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागरिकांमध्ये आता सुसंवाद घडताना दिसत आहे. कारण मुंढेंच्या वॉक विथ कमिश्नर या मोहीमेला नागरिक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मागील आठवड्यात गोल्फ क्लब मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर आज कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथल्या नागरिकांनी उद्यानाची देखभाल, दुरुस्ती, पाणी आणि अतिक्रमनाबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. यानंतर आयुक्तांनी सगळ्या समस्या तात्काळ सोडवण्याचं आश्वासनही दिलं. यावेळी आयुक्तांनी मनपाचं उत्पन्न वाढवण्यासाठी करवाढ करणं गरजेचं असल्याचा पुनरोच्चार नागरिकांसमोर केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram