नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा 'वॉक विथ कमिशनर' उपक्रम
नाशिक शहरात आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला सुरुवात केली आहे. शहरातील गोल्फ क्लब मैदानावर या उपक्रमाला सुरुवात झाली. शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी हा उपक्रम सुरु केल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे. तुकाराम मुंढे यांनी यादरम्यान नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. मागील आठवड्यात हा कार्यक्रम अर्धवट सोडूनच आयुक्त माघारी परतले होते.