
नाशिक : एमजी रोडवर पार्क केलेल्या फोक्सवॅगन कारला आग, इलेक्ट्रिक डीपीमुळे आगीचा अंदाज
Continues below advertisement
नाशिकच्या एम जी रोडवर आज एका फोक्सवॅगन गाडीला आग लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही कार इलेक्टिक डीपीच्या अगदी जवळ पार्क केली असल्याने आग लागली असल्याचा संशय व्यक्त होतोय. दुपारी साडेबाराच्या सुमारास कारला अचानक भीषण आग लागल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती. अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली.
Continues below advertisement