UNCUT : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचं सडेतोड भाषण
सिडकोतील कारवाई ही संवादाच्या अभावातून झाली. मात्र त्यात आपली काही चूक नसताना फक्त माझ्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ नये, म्हणून कोर्टात माफी मागितल्याचं नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. याशिवाय नगररचना विभागाचे अभियंते रविंद्र पाटील यांच्या आरोपांचाही समाचार घेत त्याही प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जाईल, असं मुंढे म्हणाले. काल दाभोलकर-विवेक या व्याख्यानमालेत मुंडे बोलत होते.