नाशिक : 22,23 डिसेंबरपासून हवाई सेवेला सुरुवात होणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिकहून विमान वाहतूक डिसेंबरअखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. एअर डेक्कनच्या 19 सीटर विमानाची सेवा येत्या 22, 23 डिसेंबरपासून नाशिक येथून सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भात दोन ते तीन दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.