नाशिक : तुकाराम मुंढेंनी पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला
Continues below advertisement
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्याला दणका दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी आज (शुक्रवार) पालिकेत एक बैठक बोलावली होती. याच बैठकीत गणवेश परिधान करुन न आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला त्यांनी थेट बैठकीतून बाहेर काढलं.
तुकाराम मुंढे हे आपल्या शिस्तशीर कारभारासाठी प्रसिद्ध आहेत आणि याचा प्रत्यय नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी आला.
तुकाराम मुंढे यांनी बोलवलेल्या पालिकेतील बैठकीला अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे आधीच उशिरा पोहचले. त्यातही ते गणवेश परिधान न करुन आल्याने त्यांना गणवेश घालून येण्याच्या सूचना देत बैठकीतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अनिल महाजन हे पंधराच मिनिटात गणवेश परिधान करुन पुन्हा बैठकीला हजर झाले.
दरम्यान, पहिल्याच दिवशी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारभाराची चुणूक दाखवल्यामुळे पालिकेतील अधिकारीही चांगलेच धास्तावले आहे.