नाशिक : धारणकरांच्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार नाही, तुकाराम मुंढेंची पत्रकार परिषद
Continues below advertisement
नाशिक महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी कामाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेटाळला आहे. धारणकर मार्च महिन्यापासून 45 दिवस सुट्टीवर होते, तसेच त्यांनी तणावाची कोणतीही तक्रार दिलेली नव्हती, असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं. संजय धारणकर यांनी गुरुवारी आत्महत्या करत आपण कामाच्या तणावामुळे जीवनयात्रा संपवत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवली. विशेष म्हणजे दीर्घ रजेनंतर ते नुकतेच कामावर रुजू झाले होते. ते नसताना त्यांचा चार्ज दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिलेला होता. एबीपी माझाने तुकाराम मुंढे यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत करुन या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement