नाशिक : करवाढ रद्द करण्याचा महासभेचा निर्णय रद्द, तुकाराम मुंढेंचा दावा
Continues below advertisement
नाशिक महापालिकेत सुरु असलेला आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष हा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण करवाढ रद्द करणारा नाशिक महापालिकेच्या महासभेन घेतलेला निर्णय बेकायदेशीर असलायचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे केलाय. करवाढीच्या प्रस्तावावर गुरुवारी महासभेत 10 तास चर्चा झाली. आयुक्तांनी लादलेली करवाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप लोकप्रतिनिधी करत होते. मात्र या महासभेत आयुक्त मुंढे यांना बोलू देण्यात आले नव्हते. त्यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन महासभेच्या निर्णयाला बेकायदेशीर आणि अशासकीय ठरवीत सत्ताधारीसह सर्व लोकप्रतिनिधीना आव्हान दिलंय.
Continues below advertisement