नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग
Continues below advertisement
देशभरात आज (मंगळवार) सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. औरंगाबादमधील घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. तर पहाटे विधीवत दुग्धाभिषेक सोहळा पार पडला. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे.
तर मुंबईचं बाबुलनाथ मंदिर आणि पुण्याच्या भीमाशंकर मंदिरातही भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. रात्री पासून देशभरात भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.
आज देशभरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणांना भेट देतात. यावेळी शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेकही करण्यात येतो. तसंच बेलाची पानं देखील शिवलिंगावर अर्पण केली जातात.