नाशिक : अशोक स्तंभ परिसरात महाकाय झाड रस्त्यावर कोसळलं
Continues below advertisement
नाशिकमध्येही अशोकस्तंभ परिसरात निंबाचा एक महाकाय वृक्ष सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेतून तीन वाहनचालक थोडक्यात बचावले आहे. सकाळच्या वेळी वर्दळ कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. हे झाडं विद्युत पोलवर पडल्याने 4 विद्युत पोल पूर्णत: वाकले तर त्यांच्या ताराही तुटून पडल्यात. परिणामी दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. अग्निमशमन विभागावे अवघ्या काही वेळेतच घटनास्थळी धाव घेतली होती, कटरच्या साहाय्याने रस्त्यावरील झाडाच्या फांद्या कापल्या आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला.
Continues below advertisement