एसटी संप नाशिक : बससेवा ठप्प, प्रवाशांचे हाल
Continues below advertisement
मध्यरात्रीपासून लालपरी पुन्हा एकदा संपावर गेली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे अचानकपणे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सध्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे प्रवाशी ये जा करत असतात. अशा काळात एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानं प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. हा संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नाही, त्यामुळे हा संप अघोषित असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संपाबद्दल संभ्रम आहे.
Continues below advertisement