नाशिक : सोनई तिहेरी हत्याकांडातील ६ दोषींना फाशी, नाशिकच्या सत्र न्यायालयाचा निकाल
Continues below advertisement
राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडात दोषी सहा जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच या दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नाशिक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.वैष्णव यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला. दोषींपैकी एकाचं वय कमी असल्यानं आरोपींच्या वकिलांनी कमी शिक्षेची मागणी न्यायालयाला केली होती. मात्र, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोषींनी केलेलं कृत्य बघता त्यांना फाशीच व्हावी, असा युक्तीवाद केला. न्यायालयाच्या निकालानंतर पीडितांच्या कुटुंबीयांनी अश्रू अनावर झाले होते. 2013 साली नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात ही घटना घडली होती.
Continues below advertisement