नाशिक : आंघोळ करताना शॉवरमधून करंट, डॉक्टरचा जागीच मृत्यू

Continues below advertisement
आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन शॉक लागल्याने नाशिकमधील डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. आशिष काकडे असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉ. आशिष काकडे यांच्या घरातून दुपारच्या सुमारास बाहेर पाणी येत असल्याचं सोसायटीतील रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यांनी घरात जाऊन बघितले असता, डॉ. काकडे बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी सरकारवाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram