नंदुरबार : नाशिक-नंदुरबार शिवशाहीचा अपघात, 12 प्रवासी जखमी

राज्यात शिवशाही बसच्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नाशिकहून नंदुरबारला जाणारी शिवशाही बस आणि टँकरचा अपघात झाला. यामध्ये बारा ते पंधरा जण जखमी झाले आहेत. नाशिकहून नंदुरबारला जात असलेल्या शिवशाही बसला सटाणा-ताऱ्हाबाद रस्त्यावर करंजवाडजवळ अपघात झाला. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बस ढोलबारीजवळ पोहचली असता समोरुन येणाऱ्या गॅस टँकरवर आदळली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं, तर टँकर रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. या भीषण अपघातात सुमारे 12 ते 15 जण जखमी झाले. त्यापैकी तिघा जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मालेगावला हलवण्यात आलं, तर अन्य जखमींवर सटाणा आणि ताऱ्हाबाद येथे उपचार करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola