नाशिक : शिवसेनेला दिलासा, 12 तासांच्या छाननीनंतर दराडेंचा अर्ज वैध
Continues below advertisement
नाशिक विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अखेर शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज 12 तासांच्या छाननीनंतर वैध ठरवण्यात आला. दराडेंच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अर्जाच्या छाननीमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला चांगलाच घाम फोडला. शिवसेना उमदेवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतली होती.
Continues below advertisement