नाशिक: विधानपरिषद निवडणूक: शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा विजय
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली. पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे. शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी जवळपास 200 मतांनी विजय मिळवला. दराडेंना 412 मतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजी सहाणे यांना 219 मतं मिळाली.