नाशिक : इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचं चक्काजाम आंदोलन
नाशिकमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात येतंय... नाशिक शहरातल्या मुख्य द्वारका सर्कलजवळ शिवसेनेच्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झालीय... हातात गाजरं घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली... जवळपास 300 हून अधिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते या चक्का जाम आंदोलनात सहभागी झालेत.... दरम्यान चक्का जाम आंदोलनाला गालबोट लागू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर नाशिक शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे....