Shivsena-BJP Poster War | मुख्यमंत्री शिवसेनेचाच, नगरसेविकेची पोस्टरबाजी | नाशिक | ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजप 'आमचं ठरलंय' सांगत असले, तरी स्थानिक पातळीवर काहीशी धुसफूस दिसत आहे. नाशकातील नगरसेविकेने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं होर्डिंग लावल्याने सेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. भाजप प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असं वक्तव्य काल नाशिकमध्ये केलं होतं. त्यानंतर नाशिकमधील शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी भाजप कार्यालयासमोरच होर्डिंग लावलं आहे. 'मुख्यमंत्री शिवसेना भाजपा युतीचाच होणार... याचा अर्थ शिवसेनेचाच होणार' असं या होर्डिंगवर लिहिलं आहे. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचे फोटो आहेत. भाजप कार्यालयासह शहरात दोन-तीन ठिकाणी होर्डिंग लावले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram