Bribery Case | नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळेंना तीन लाखांची लाच घेताना रंगेहात अटक | ABP Majha
Continues below advertisement
नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केलीय. 3 लाख रुपयांची लाच स्विकारताना शिवाजी चुंबळे यांना रंगेहात अटक करण्यात आलीय. कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा रुजू करून घेण्यासाठी 10 लाखांची लाच मागण्यात आली होती. मात्र तडजोड करून सौदा 6 लाखांवर पक्का झाला, त्यापैकी 3 लाखांची लाच स्वीकारताना शिवाजी चुंबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केलीय. याआधी देविदास पिंगळे आणि आता शिवाजी चुंबळेंवर कारवाई करण्यात आल्यानं नाशिकमध्ये खळबळ उडालीय.
Continues below advertisement