नाशिक : राष्ट्रवादीत प्रवेश करताच शिवाजी सहाणेंना विधानपरिषदेची उमेदवारी
Continues below advertisement
विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अॅड. शिवाजी सहाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.येत्या 21 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे या उभयतांत आता सामना रंगणार आहे. अॅड. शिवाजी सहाणे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक असून पक्षविरोधी कारवायाप्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. विशेष म्हणजे आज सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित प्रवेश करताच सहाणे यांना उमेदवारी देण्यात आली.
Continues below advertisement