नाशिक : नाशिककरांना दत्तक बाप नको, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेची नाशकात सांगता झाली. या सांगता सभेत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचीही आठवण काढली.

''नाशिक मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलंय. पण या बापाने कधीही या शहराकडे पाहिलं नाही. असा बाप आम्हाला नको. भाडोत्री बापाची आम्हाला गरज नाही. आता बस्स झालं. परिवर्तनाची तयारी करा आणि यांना खड्यासारखं बाजूला करा. आजपासूनच कामाला लागा,'' असं आवाहन शरद पवारांनी केलं.

''नाशिक महत्त्वाचा जिल्हा आहे. इथले लोक प्रचंड मेहनत घेतात. मात्र सरकार पाठिशी नाही. शेतीचं उत्पन्न घटलं आहे. ज्वारी, बाजरी, तूर, सूर्यफुल या पिकांचे दर घटले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही म्हणून हे होतंय. त्यामुळे दुष्परिणाम होत आहे. यासाठी काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे,'' असं शरद पवार म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram