नाशिक : शाळेचा पहिला दिवस, चिमुकल्यांमध्ये उत्साह
Continues below advertisement
नवीन कपडे, नवीन दप्तर सोबतीला नवे पुस्तकं वह्या आणि त्याचा येणार सुगंध, असा प्रसन्न वातावरणात आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश शाळा सुरु झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी काही शाळांनी जय्यत तयारी केली. विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औक्षणानं करण्यात आलं आहे. त्यामुळे बच्चे कंपनी मोठी आनंदात आहे.
Continues below advertisement