नाशिक : पिस्तुलाचा धाक दाखवून 20 लाखांची लूट

Continues below advertisement
नाशिकमध्ये पिस्तुलचा धाक दाखवून आणि मारहाण करून तब्बल 20 लाख 45 हजार रुपये असलेली बॅग चोरट्यांनी लांबवली.
सिटी सेंटर मॉलसमोरच्या गजबजलेल्या परिसरात ही घटना घडली.
ब्रिक्स इंडिया कंपनीचे अक्षय बागुल आणि विशाल निकुंभ हे कर्मचारी सिटी मॉल मधून बाहेर पडताच पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं 3 चोर त्यांच्याजवळ आले. आणि त्यानंतर त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
ब्रिक्स इंडिया कंपनी व्यापारी आणि उद्योजकांकडून पैसे घेऊन ते बँकेत भरण्याचे काम करते.
दरम्यान या प्रसंगी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तर पोलिसांनी तपास सुरू केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram