नाशिक : सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून 15 लाखांचा मुद्देमाल लंपास
Continues below advertisement
नाशिकमध्ये 20 लाख रुपयांच्या लुटीची घटना ताजी असतानाचा आणखी एक घटना समोर आलीय. नाशिकरोड परिसरातील सराफ व्यावसायिक अभय शहाणेंच्या कारची काच फोडून 15 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारार हा प्रकार घडला. अभय शहाणे यांनी आपल्या कारच्या सीटवर दागिने आणि पैशांनी भरलेली बॅग ठेवली होती. दुकान उघडून ते आत गेले असता त्याकाळात चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून 15 लाखांचे दागिने आणि पैसे असलेली बॅग लांबवली. गेल्याच आठवड्यात सिटी सेंटर मॉल समोर बंदुकीचा धाक दाखवून 20 लाखांची लूट केली होती. यात प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आलीय. मात्र या दोन्ही घटनांमुळे नाशकातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न एेरणीवर आलाय.
Continues below advertisement