नाशिक : मोबाईल शोरुम फोडलं, 20 लाखांचा मुद्देमाल लांबवला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकमध्ये मोबाईल शो रुम फोडून २० लाख रुपये किमतीचे आयफोन, सॅमसंग आणि इतर कंपन्यांचे तब्बल 79 फोन चोरण्यात आलेत. तसच एक लॅपटॉप घेऊन चोर पसार झालेत. पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दुकानाचं लॉक तोडून शटर वाकवत २ चोरांपैकी एकाने दुकानात प्रवेश केला. तसच आपली ओळख पटु नये म्हणून त्याने चेहऱ्याला मास्क देखील लावल्याचं स्पष्टपणे दिसतंय. गंगापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.