नाशिक : वाहनांच्या VIP नंबर विक्रीतून आरटीओला 77 कोटींचं उत्पन्न

हौसेला मोल नसतं, असं नेहमी म्हटलं जातं आणि हे काहीसं खरं देखील आहे. कारण  दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या व्हीआयपी नंबरसाठी अनेक हौशी लोक लाखो रुपये मोजत असल्याचं समोर आलं आहे. कारण राज्यभरात आरटीओला गेल्या 8 महिन्यात व्हीआयपी नंबर्सच्या मागणीतून तब्बल 77 कोटींच उत्पन्न मिळालं आहे.

व्हीआयपी नंबर्सच्या मागणीत राज्यात पुणे अग्रेरस असून, पुणे आरटीओनं 30 हजार 366 व्हीआयपी नंबर्सच्या विक्रीतून जवळपास 23 कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. त्यापाठोपाठ नाशिक आरटीओनं 19 कोटी, ठाणे आरटीओनं 10 कोटी, कोल्हापूर आरटीओनं 7 कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे.

तर मुंबईमध्ये अंधेरी, बोरीवली, वडाळा आणि ताडदेव आरटीओनं 6 हजार 652 वाहनांची विक्री केली असून, त्यातून जवळपास 6 कोटींची कमाई केली आहे. चारचाकी वाहनासाठी 1 हा नंबर सर्वाधिक 12 लाख रुपयांना विकला गेला असल्याची माहिती आरटीओनं दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola