नाशिक : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उंदराचा रेल्वे कर्मचाऱ्याला चावा

Continues below advertisement
विधीमंडळात उंदीर घोटाळा गाजत असतानाच, तिकडे पंचवटी एक्स्प्रेसमध्येही उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय.

एरव्ही प्रवाशांना हैराण करणाऱ्या उंदरांनी यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यालाच लक्ष्य केलं. उंदराने रेल्वे कर्मचाऱ्याच्या पायाचा चावा घेतला.

निफाड ते मुंबई प्रवासादरम्यान उंदराने कर्मचाऱ्याचा चावा घेतला.

पंचवटीसह सर्वच एक्स्प्रेसमध्ये उंदीर उच्छाद मांडत असल्याची तक्रार प्रवासी वारंवार करतात. मात्र त्यावर ठोस उपाय काही होत नाही.

आता उंदराने रेल्वे कर्मचाऱ्याचाच चावा घेतल्यावर तरी प्रशासन जातीने लक्ष घालणारा का,  अशी विचारणा रेल परिषदेनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram