सिडकोची घरं फ्री होल्ड, नाशिककरांच्या प्रतिक्रिया | नाशिक | एबीपी माझा
सिडकोच्या घरांबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद, नाशिक आणि नवी मुंबई शहरातील सिडकोची घरं 99 वर्षे कराराच्या लीजऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मालकी घर धारकाला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे.