ब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन
Continues below advertisement
नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी लादलेल्या करवाढिविरोधात जोरदार आवाज उठतोय. आज यासंदर्भात पालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन केलं आहे. आयुक्तांनी शहरातील सर्व मालमत्ता आणि जमिनींवर कर लादला आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपाला टीकेचं धनी बनावं लागत आहे. या महासभेदरम्यान महापालिकेच्या गेटवर शेतकऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आंदोलन करणार आहेत. दरम्यान विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आजच्या महासभेत करवाढीसंदर्भातला निर्णय होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.
Continues below advertisement