नाशिक : चंदन उटीच्या वारीसाठी त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज
Continues below advertisement
चंदन उटीच्या वारीसाठी त्र्यबकेश्वर सज्ज झालं असून हजारो भाविक त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. उन्हाच्या दाहकतेपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवनी समाधीचा बचाव व्हावा, यासाठी समाधीला चंदनाची उटी लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे चंदनाचा लेप उगाळण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भजन आणि ओव्या म्हणत वारकरी चंदन उगाळण्यात मग्न झालेले दिसत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात सर्वत्र चंदनाचा सुवास दरवळत आहे. प्रत्यक्ष समाधीला लेप लावण्याचा सोहळा उद्या पार पडणार आहे.
Continues below advertisement