नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन
Continues below advertisement
नाशिकमध्ये आयुक्तांच्या विरोधात वातावरण चांगलंच तापताना दिसतं आहे. नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी लादलेल्या करवाढीविरोधात जोरदार आवाज उठतो आहे. नाशिककरांनी आयुक्तांविरोधात महापालिकेच्या गेटवर आंदोलनाला सुरुवात केली. समाजातला प्रत्येक घटत या आंदोलनात सहभागी झाल्याचं चित्र आहे. शेतकरी, वकील, वारकरी, उद्योजक सर्वांचे प्रतिनिधी पालिकेच्या गेटवरच ठिय्या मांडून आहेत. भजन, किर्तन म्हणलं जातय, शिवाय जोरदार घोषणाबाजीही केली जाती आहे.
Continues below advertisement