नाशिक : तुकाराम मुंढेंच्या मनपा आयुक्तीपदी नियुक्तीने अधिकारी धास्तावले
Continues below advertisement
नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यानं नाशिकमधील अधिकारी पदाधिकाऱ्यांना धडकी भरली आहे. त्यामुळे काही करून तुकाराम मुंढेंची नियुक्ती लांबणीवर जावी यासाठी काही लोकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महानगर पालिकेच्या कारभारात सुसूत्रता यावी आणि रखडलेली कामे मार्गी लागावी यासाठी डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेना जाणीवपूर्वक नाशिकला पाठविण्यात आल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement