नाशिक : द्राक्ष आणि कांद्याच्या निर्यातीत दुपटीने वाढ

Continues below advertisement
कृषीदिनानिमित्त कृषीसंपन्न नाशिक जिल्ह्यातील शेतीप्रगतीचा आढावा घेणार आहोत.
नाशिकमधून कांदा-द्राक्ष पिकांच्या निर्यातीत विलक्षण वाढ झाली आहे. महाराष्ट्रातून ३३ टक्के कांदा देशात निर्यात होतो. ज्यात ७० टक्के वाटा हा एकट्या नाशिक जिल्ह्याचा आहे.
आधी ४ हजार टन निर्यात होणारा शेतीमाल आता तब्बल १ लाख टन इतका निर्यात होतो...बदलल्या तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकमधली शेती समृद्ध होत गेली.
कांदा, द्राक्ष, डाळिंब, ज्वारी, बाजरीमध्ये भरघोस उत्पन्न येत असल्यानं शेतकऱ्यांनी जोडव्यवसायांनाही सुरूवात केली. कुक्कुटपालन, साखर कारखाने, वायनरी यांसारख्या उद्योगांसोबतच शेळ्यांची निर्यात लक्षात घेता गोटफार्म आणि मुंबई-पुण्याला होणारा दुधाचा पुरवठा पाहता दुग्धव्यवसायही जोर धरू लागले. यामुळे साहजिकच रोगजारही वाढला आणि नाशकातील कृषीव्यवसाय भरभराटीला आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram