नाशिक : उपचाराआधी बिडी द्या, आजोबांची 'तलफ' चर्चेत

नाशिक जिल्हा रुग्णालयातल्या एका खड्ड्यात पडलेल्या आजोबांना अग्निशमन दलानं सुखरुपरित्या बाहेर काढलं. मात्र ही घटना चर्चेत आली ती म्हणजे या आजोबांच्या बिडी ओढण्याच्या तलफेमुळे. काल रात्रीच्या सुमारास एक आजोबा 20 फुट खोल खड्ड्यात पडले. अग्निशमन दलानं त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्याची धडपड सुरु होती. मात्र आपल्याला दवाखान्यात नेण्याआधी
आणि कुठल्याही औषधाआधी बिडी द्या, असा आग्रह आजोबांनी धरला. त्यामुळे बचावकार्यानंतर अग्निशमनच्याच कर्मचाऱ्यांना बिडीसाठी शोधाशोध करावी लागली. अखेर बिडी आणल्यानंतर आजोबांनी दोन झुरके ओढले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola